आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:गुंजोटी येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

गुंजोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक सलग तिसऱ्यांदा ग्रामस्थांच्या पुढाकारातून बिनविरोध काढण्यात आली. संचालक मंडळासह चेअरमन व व्हॉइस चेअरमनची निवड बिनविरोध झाली. चेअरमनपदी माजी सरपंच सहदेव गायकवाड तर व्हाइस चेअरमनपदी महेश शंकरराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालक म्हणून बलभीम शाईवाले, असिफ मुन्शी, राजेंद्र गायकवाड, लिंबाजी दूधभाते, किशन पाटील, ओमप्रकाश शिंदे, एम. ए. सुलतान, विजय खमीतकर, दत्तू कटकधोंड, भारतबाई कदेरे, सुरेखा माळगे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एल. शहापूरकर यांनी काम पाहिले. माजी सभापती एम. ए. सुलतान, संस्थेचे सचिव बालाजी पोतदार यांच्या वतीने नूतन चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच शंकरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विलास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले. या वेळी रवींद्र ढंगे, सिद्राम देशमुख, चंदू कदेरे, बबन आयनले, इम्रान मुजावर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...