आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचे‎ लक्ष:23  ग्रामपंचायतीतील उपसरपंच‎ निवडी होणार 10, 11 जानेवारीला‎

उमरगा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील‎ उपसरपंचपदाच्या निवडी १० आणि‎ ११ जानेवारी २०२३ रोजी होणार‎ आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू‎ झाली असून उपसरपंचपदी कोणाची‎ वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे‎ लक्ष लागले आहे.‎

उमरगा तालुक्यात २३‎ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी थेट‎ जनतेतून सरपंचांच्या निवडी‎ झाल्यानंतर उपसरपंचपदाच्या‎ निवडीची प्रतीक्षा लागली होती.‎ अखेर उपसरपंच निवड १० व ११‎ जानेवारी या दोन दिवसात अध्यासी‎ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली‎ होणार आहे. ज्या ग्रामपंचायतीचे‎ सरपंचपद आरक्षित असलेल्या‎ गावात उपसरपंच पदासाठी‎ इच्छुकांची संख्या अधिक असली‎ तरी इतर ठिकाणीही उपसरपंचाची‎ माळ आपल्याच गळ्यात पडावी‎ म्हणून इच्छुकांनी गावात मोर्चे‎ बांधणी सुरू केली आहे.

उपसरपंच‎ निवड कार्यक्रम जाहीर झाल्याने‎ कोणत्या गावात कोण उपसरपंच‎ होणार, याकडे तालुक्याचे लक्ष‎ लागले आहे. उपसरपंचपदाच्या‎ निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला‎ असून दहा जानेवारीला येणेगुर,‎ आलुर, केसरजवळगा, कोथळी,‎ भुसणी, बेळंब, माडज, चिंचोली‎ (भूयार), एकुरगा, नारंगवाडी,‎ सुंदरवाडी, कलदेवनिंबाळा,‎ चिंचोली (जहागीर) या १३‎ ग्रामपंचायत येथील उपसरपंचाची‎ निवड होणार आहे.

११ जानेवारी‎ रोजी मळगी, औराद, धाकटीवाडी,‎ कोराळ, मळगीवाडी, आनंद नगर,‎ वरनाळवाडी, कंटेकुर,‎ महालिंगरायवाडी, त्रिकोळी येथील‎ दहा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची‎ निवड होणार आहे. उपसरपंच‎ निवडीसाठी १३ अध्यासी‎ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात‎ आल्या आहेत. निवड बैठकीच्या‎ पूर्वी सरपंचासह सर्व सदस्यांना‎ बैठकीला उपस्थित रहाण्यासंदर्भात‎ नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू‎ केली.

बातम्या आणखी आहेत...