आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष:व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर, मुदत संपलेल्या पदार्थांची विक्री; सरमकुंडी फाट्यावर दररोज 30 घरगुती सिलिंडरचा वापर

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे. प्रवासी, ग्राहकांना पॅकिंगमधील मुदतबाह्य अन्नपदार्थाची विक्री सुरू आहे. याकडे अन्न व औषध विभागाची डोळेझाक होत आहे.

राज्यात कुंथलगिरीच्या पेढ्यांना चांगली मागणी आहे. प्रवासी सरमकुंडी फाट्यावर बस थांबल्यावर किंवा खासगी वाहन थांबवून पेढा घेतात. सोलापूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग ५२ वर हे ठिकाण असल्याने येथून एसटीच्या १०० हून अधिक फेऱ्या होतात. तुळजापूरचे येणारे भाविक व अजिंठा-वेरुळला व शेगावला जाण्याऱ्या खासगी वाहने येथून जात असल्याने दररोज हजारो प्रवासी येथे थांबतात. यामुळे पेढा व्यवसायासह हॉटेल व अन्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. स्थानिकसह परराज्यातील व्यावसायिकांनीही येथे व्यवसाय थाटले आहेत.

परंतु, येथे हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर सुरू आहे. सिलिंडर व्यावसायिकांना सहज उपलब्ध होतात. येथे लहान-मोठे २०० व्यावसायिक आहेत. त्यांना दररोज प्रत्येकी १ ते ५ घरगुती सिलिंडर लागतात. याबाबत दैनिक ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधिनीने भूम रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये पाहणी केली असता त्या ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर हे केवळ दिखाव्यासाठी ठेवलेले होते तर शेगडीला ५ घरगुती सिलिंडर वापरात असल्याचे निदर्शनास आले.

या ठिकाणी असलेल्या हॉटेलांची संख्या व प्रत्येकी दैनंदिन वापराची संख्या पहिली असता दिवसाला किमान ३० सिलिंडर संपू शकतात. ज्यामुळे गगनाला भिडलेल्या घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊन पुन्हा एकदा भाव वाढीस हे कारणीभूत ठरून सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...