आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील भूमिअभिलेख कार्यालयात शेतजमीन मोजण्यासाठी अर्ज येत आहेत. परंतु पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना सहा महिने ते दीड वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.
त्यामुळे मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतजमिनीचे वाद असोत की स्वतःची जमीन मोजून दुरुस्ती असो, त्यासाठी ही जमीन शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मोजून घेतली जाते. येथील भूमिअभिलेख कार्यालयात चलन भरून अर्ज करावा लागतो. २ हेक्टरपर्यंत मोजणीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. साधा अर्ज, तातडीचा अर्ज, अतितातडीचा अर्ज असे प्रकार आहेत. अर्जदाराच्या वर्गवारीनुसार त्यास जमीन मोजणीची तारीख दिली जाते. कार्यालयाचे उपाधीक्षक एम. सी. गाडगे हे कार्यालयाकडे फिरकत नसल्याने उपस्थित कर्मचारी कार्यालयात मोजणीच्या कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना साहेब नसल्याचे कारण सांगत आहेत.
शेतकरी दिवसभर थांबून कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे ऐकून माघारी फिरत आहेत. उपाधीक्षक कार्यालयाकडे येण्याऐवजी पार्डी फाट्याकडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना फाइल घेऊन बोलावून घेतात व तेथेच कागदपत्रावर स्वाक्षरी करतात, असे एका शेतकऱ्याने सांगितले. तातडीच्या मोजणीचे अनेक अर्ज कार्यालयात दाखल झाले आहेत. अतितातडीची मोजणी अतितातडीची मोजणी करायची असेल तर २ हेक्टरपर्यंत ३ हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. अर्ज दाखल केल्यापासून २ महिने ते ४ महिन्यानंतरची तारीख अर्जदाराला दिली जाते. ड्रोन सर्व्हेसाठी दोन कर्मचारी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत वैयक्तिक मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी एक कर्मचारी परंडा येथे व एक कर्मचारी उस्मानाबाद येथे आहे. यामुळे कार्यालयात केवळ वर्ग-३ चे चार व उपाधीक्षक-१ हे पद रिक्त आहेत.
२०२१ मध्ये चलन भरले
शेत जमिनीच्या मोजणीसाठी १४ महिन्यांपूर्वी भूमिअभिलेख कार्यालयाकडे ६ मार्च २०२१ रोजी चार हजाराचे चलन भरले. चलन भरल्यापासून मी कार्यालयाकडे वारंवार चकरा मारत आहे. तरीही माझ्या जमिनीची मोजणी झाली नाही. वैतागून मनात आत्महत्येचा विचार येत आहे.
- शिवहार मनगिरे, शेतकरी, पाथरुड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.