आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात लाळ्या खुरकूत आजाराच्या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली असून परिसरातील पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.कृष्णा रेड्डी यांनी केले आहे.लाळया खुरकूत हा एक विषाणूजन्य आजार आहे.
तो दोन खूर असणाऱ्या गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, वराह इत्यादी प्राण्यांना होतो. हा संसर्गजन्य आजार असून खूप वेगाने फैलावतो .या आजाराचा प्रसार हवेतून, बाधित जनावराच्या चारा पाण्यातून , बाधित जनावराचा संपर्क आल्यामुळे, व बाधित जनावराच्या संपर्कात आलेल्या माणसामुळे होतो.
या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण जरी कमी असले तरी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. जनावरांची ओढकाम करण्याची शक्ती कमी होते, दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे प्रमाण कमी होते, अंगावरचे केस वाढतात ,खुर वाढतात इतर आजारांना जनावर बळी पडतात व जनावरांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण देखील वाढते. तोंडखोरी, पायखुरी मुळे जनावरांच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये जखमा होतात.
या जखमांमध्ये सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन जनावरांना चारा खाता येत नाही व पायाने लंगडतात. या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.लहरी निसर्ग,महागडी खते व बियाणे तसेच पीकांवर पडणारे रोग यामुळे शेतकरी जेरीस आला असताना रोगांची साथ गंभीर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.