आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:‘वंचित’ने तुळजापुरात चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेस मारले जोडे

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. येथील जुन्या बसस्थानकासमोर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात जावून नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले. निवेदनात म्हटले आहे की, पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करा. पुणे येथील शाईफेक आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल चुकीचे गुन्हे त्वरीत मागे घ्या. शाईफेक आंदोलनासंबंधात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्या. यावेळी मिलिंद रोकडे, जीवन कदम, मनोज सोनवणे, कमलेश कदम, विकास बनसोडे, रवी साखरे, धम्मशील कदम, सूरज चौधरी, बाळासाहेब राऊत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...