आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहेकर महाविद्यालयात कार्यक्रम:वंदे मातरम् हा स्वातंत्र्य वीरांचा मंत्र आहे; डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या भाषणाला प्रतिसाद

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंदे मातरम हा स्वातंत्र्य वीरांचा मंत्र आहे, यातूनच स्वातंत्र्यवीरांना राष्ट्रासाठी लढण्याचे बळ मिळाले त्यामुळे भारतीयांना हा मंत्र वंदनीय असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रीय विचारांचे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी कळंब येथे केले.रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या वतीने कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव मोहेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, रोटरीचे अध्यक्ष डॉ.सचिन पवार, सचिव डॉ. अभिजित जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शेवडे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच राज्यात सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून राष्ट्रभक्तीचे हे वातावरण सर्वत्र निर्माण होण्याची गरज आहे. तसेच वंदे मातरमला कोणत्याही समाजाचा, समूहाचा विरोध असण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद करतानाच एकेकाळी लाहोर येथून उर्दू भाषेतून वंदे मातरम काढले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी संपुर्ण सभागृह वंदे मातरम ,भारत मातेच्या घोषणांनी दणाणून सोडलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सूर्यवंशी यांनी तर आभार संजय देवडा यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...