आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार घुमणार:तुळजाभवानीच्या दरबारातून आज‎ होणार वनवास यात्रेला सुरुवात‎, पहाटे आणि संध्याकाळी करणार प्रवास‎

धाराशिवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर‎ मराठा आरक्षणाचा एल्गार पुन्हा घुमणार असून‎ तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढण्यात येत आहे.‎ तुळजाभवानी मातेच्या दरबारातून वनवास यात्रेला प्रारंभ‎ होणार आहे. मराठ्यांना ओबीसींमधून कायद्याच्या‎ कसोटीवर टिकणारे ५० टक्क्यांच्या आतील‎ आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (दि.६) तीर्थक्षेत्र‎ तुळजापूर येथून पायी मराठा वनवास यात्रा निघणार‎ आहे.

आरक्षण घेतल्याशिवाय तुळजापूर सोडणार‎ नसल्याचे यात्रा प्रमुख योगेश केदार यांनी येथील‎ शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत‎ सांगितले.‎ यावेळी सुनिल नागणे, प्रताप कांचन पाटील आदींची‎ उपस्थिती होती.

जमावबंदी लागू

योगेश केदार म्हणाले की, ओबीसींची‎ महाराष्ट्रात केवळ ३४ टक्के संख्या आहे. त्या अनुषंगाने‎ ओबीसींना १७ टक्के आरक्षण देय आहे. त्यादृष्टीने‎ मराठ्यांचा ओबीसीत समावेश गरजेचा आहे. मराठा वनवास यात्रेत‎ ओबीसी समाजाच्या वतीने‎ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात‎ येत आहे.

यावेळी महेश केदार,‎ शाम माळी, तात्या महाराज लोमटे,‎ विशाल केदार, प्रशांत कांचन‎ पाटील, कन्हैया लंबे, विशाल‎ सावंत, विशाल केदार, औदुंबर‎ खलाटे उपस्थित होते. दरम्यान,‎ मराठा वनवास यात्रेला मराठा क्रांती‎ मोर्चाचा विरोध पाहता पोलिसांनी‎ खबरदारी म्हणून कलम १४४ लावत‎ जमावबंदी लागू केली आहे.‎

पहाटे, संध्याकाळी चालणार

उन्हाळ्याचा विचार करता, ही वनवास यात्रा पहाटे ५ ते‎ सकाळी १० पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान‎ चालणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या‎ वेळेत आराम केला जाईल. या शिवाय खबरदारी म्हणून‎ रुग्णवाहिका, आरोग्य सुविधा सोबत असणार‎ असल्याचे केदार यांनी सांगितले.‎