आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम; तुमचे डोळे जगू द्या हे यंदाचे घोषवाक्य, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दि २५ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधी मध्ये "Let your Eye Live" " तुमचे डोळे जगू द्या " या घोषवाक्यानुसार ३७ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन तुमचे डोळे जगू द्या हे यंदाचे घोषवाक्य, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन समारंभ दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी शासकिय वैद्यकीय महाविदयालय व जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी . के. पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैदयकिय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ, शासकिय वैदयकिय महाविदयालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.पवन महाजन सर, डॉ.श्वेता पवार नेत्रविभागाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ.मुस्तफा पल्ला, डॉ. महेश पाटील, डॉ.सुखदेव राठोड, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, निलेश कुरील, नेत्रविभागाचे वॉर्ड इन्चार्ज वहिदा शेख इतर तसेच नेत्रविभागातील सर्व अधिपरिचारिका व वर्ग-४ कर्मचारी व रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ ,अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम डॉ. विरभद्र कोटलवाड यांनी केले.

नेत्रदानाकडे सकारात्मक नजरेने पाहा
या नेत्रदान पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.महेश पाटील यांनी नेत्रदान व अंधत्वा बाबतची सदयस्थिती तसेच नेत्रदानाची आवश्यकता, महत्व याबाबत उपस्थितास मार्गदर्शन केले . यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील सर यांनी अध्यक्षीय समारोप करताना नेत्रदानाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे व यांची सुरवात ही स्वत:पासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच यांनी नेत्रदान यांना चळवळ समजून प्रत्येकांना यामध्ये सहभाग वाढविणे गरजेच आहे सांगुन नेत्रदान समंतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले व नेत्रदान पंधरवडा अंतर्गत उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय व प्रा आ.केंद्रस्तरावर जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...