आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त येथील धारासुरमर्दिनी फेडरेशनच्या वतीने गेल्या सतरा वर्षांपासून महिला दिनाचे आयोजन केले जाते. स्वयंवर मंगल कार्यालयात प्रत्येक महिला मंडळाने एक से बढकर एक परफॉर्मन्स देऊन रसिका मधून वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात फेडरेशनच्या अध्यक्ष संगीता काळे यांच्या प्रास्तविकाने झाली.उपाध्यक्ष डॉ. रेखा ढगे , सचिव नीता कठारे, कोषाध्यक्ष माधवी भोसरेकर, प्रसिद्धी प्रमुख उज्वला कुलकर्णी , संस्थापक अध्यक्ष डॉ. अनार साळुंके, माजी अध्यक्ष विनीता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा झाला. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीलाच फेडरेशनच्या पूर्वअध्यक्षा मंजुषा कोकिळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन मुली व पती यांनी दिलेले पंचवीस हजार रुपये मंजुषा स्मृतीसहाय्य निधी गीता कट्टी यांना प्रदान करण्यात आले. हा निधी दरवर्षी एका गरजू महिलेला देण्यात येणार असून यामधूनच आपली पत्नी मंजुषा कोकिळ हिच्या स्मृती जागवल्या जातील असे त्यांचे पती बाळासाहेब कोकीळ म्हणाले.यावेळी उज्वला मसलेकर ,माधवी भोसरीकर,डॉ. रेखा ढगे, बाळासाहेब कोकीळ यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनार साळुंके यांनी केले ,तर आभार प्रदर्शन नीता कठारे यांनी केले. कार्यक्रमात वीरशैव महिला मंडळ ,राष्ट्रसेविका समिती, सावित्रीबाई फुले मंडळ , उद्योगिनी महिला मंडळ , शताक्षी महिला मंडळ, स्वयंवर योग साधक महिला मंडळ,गुरुवार महिला मंडळ, कालिका देवी महिला मंडळ , तेजस्विनी महिला मंडळ , भावसार महिला मंडळ , जिव्हेश्वर महिला मंडळ या मंडळांनी तसेच सावित्री सखी , पार्वती ग्रुप ,हंबीरे ग्रुप , नवलाई ग्रुप , मॉडर्न यंग सासू ग्रुप ,तेरणा प्रोफेसर ग्रुप , कालिका प्रतिष्ठान , तेजस्विनी ग्रुप यांनीही एकापेक्षा एक वेगवेगळया विषयावर आपले सादरीकरण करून प्रेक्षकांमधून वाहवा मिळवली. सुनीता गुंजाळ लिखित माझा बस प्रवास या कथेचे डॉ. रेखा ढगे यांनी केलेल्या नाट्यरुपांतराला प्रतिसाद मिळाला.
स्वरूप दरवर्षी बदलत आहे
यंदा महिला दिनानिमित्त जिल्हयात विविध मंडळांच्या वतीने उत्तम प्रकारचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न झाला. तालुक्यातील अनेक महिलांनी आपले सादरीकरण केले. केवळ मनोरंजनावर भर न देता प्रबोधन करण्याचाही प्रयत्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रातील महिला विदुषींनी आपले विचार मांडले. यामध्ये युवती तसेच ज्येष्ठ महिलांचाही सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.