आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न:उमरगा राेटरीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब उमरगाच्या वतीने “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त दि.०६ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी दि.१५ रोजी झाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शहरातील मलंग विद्यालयामध्ये पार पडला. तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चित्रकला , वक्तृत्व ,वेशभूषा,टॉक अबाउट आदी स्पर्धांचा समावेश होता.

स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.सुरेखाताई मलंग तर प्रमुख पाहुणे डॉ.सुचेता पोफळे, गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्तार अधिकारी कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एस.मलंग, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे अजित गोबारे, सचिव रोटे रणजीत बिराजदार,डॉ.मृणालिनी बुटुकने,उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...