आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील खंडेश्वर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.खंडेश्वर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ खैरे, संचालिका रोहिणी सातपुते, सागर खैरे कार् डॉ.रमा मोरे, पोलीस निरिक्षक आमोद भुजबळ, एपीआय कविता मुसळे, गोरे, महिला पोलीस मुल्ला, बेडके, शेळके नूरजहाँ शेख, मुख्याध्यापक आप्पासाहेब कांबळे व संजय जाधव आदी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तळ्यात मळ्यात अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लिंबू चमचा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात या खेळात प्रथम क्रमांक मुल्ला, सुषमा वाघमोडे, प्रियांका निकत, पूजा कदम, प्रियंका वैद्य, अफसाना शेख आदीनी पटकावला.
यावेळी प्रियांका डिसले, राधा काकडे, जानवी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्वशीला कांबळे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार अर्चना बनसोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद प्रियांका डिसले, सोनाली लाडे, समिना सय्यद, मंजुषा भांगे, सत्वशीला कांबळे, दिपाली मोरे, श्याम जाधव, वर्षा गरड, ज्योती जगदाळे अर्चना बनसोडे, तब्बसूम पठाण, भिमाशंकर विभुते, अंकुश पोळ, निकिता आगरकर, राधा काकडे आदीनी परिश्रम घेतले.
जळकोटवाडी शाळेत जागतिक महिला दिन
जळकोट| केंद्र होर्टी अंतर्गत जि. प. प्रा. शाळा जळकोटवाडी (नळ) येथे ८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील प्रतिष्ठित महिलांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने गावातील कर्तबगार महिलांचा हार गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कर्तबगार माहिलांच्या कार्याविषयी शाळेचे मुख्याध्यापक उमेश भोसले यांनी माहिती सांगितली.उपस्थित महिलांनी महिला दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित महिलांची संगीतखुर्ची ,गायन स्पर्धा, उखाणे स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले .शाळेतील मुलींनी विविध विविध वेशभूषा धारण केली होती. शाळेचे सहशिक्षक अशोक राठोड यांनी उपस्थित सर्वं महिलांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी गावातील सर्व पालक महिला वर्ग, आशाताई,अंगणवाडी सेविका, मदतनीस ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितिन राठोड, अनिल राठोड, राजाराम लोखंडे, उमेश भोसले , सहशिक्षक अशोक राठोड , अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेतील बालचमू उपस्थित होता. महिलांना पुरूषांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठीही आंदोलने होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.