आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:तांदुळवाडी मध्ये विविध मान्यवरांचा   पुरस्काराने गौरव

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे खंडोबा यात्रेनिमित्त यावर्षी समजतील घटकांसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.खंडेराया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षकरत्न पुरस्कार शिवशंकर राऊत, उध्दव चौधरी यांना उद्योगरत्न,समाधान गाढवे यांना कृषिरत्न, रमेश चौधरी यांना समाजरत्नमारुती करंडे यांना कलारत्न पुरस्कार ,नानासाहेब चौधरी, गोवर्धन चौधरी यांना सेवा पुरस्कार,तर नीट परीक्षेत यश संपादन केले बद्दल तुषार चौधरी,आदित्य गुंजाळ यांच्यासह स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत,भैरवनाथ शुगर चे केशव सावंत,संस्थेचे सचिव रमेश गाढवे,बालाजी माने,दादाराव उंदरे,धैर्यशील चेडे यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...