आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमाचे आयोजन:ढोकीत दत्त जयंतीदिनी आज विविध कार्यक्रम

ढोकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील निसर्गरम्य दत्त टेकडीवरील प्रभू गुरुदेव दत्तांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्त टेकडीवर भगवान गुरुदेव दत्त यांचे भव्य मंदिर असून या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दत्त मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त दत्त मंदिरास विद्युतीकरण करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यास व मंदिर परिसरात विविध फुलांनी सजवले आहे.

जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक ७ रोजी पहाटे श्री गुरुदेव दत्तात्रेयांच्या मूर्तीची अभिषेक महापूजा होणार आहे.तसेच दिवसभर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते सात या वेळेत ह. भ. प. शिवाजीनाना घाडगे महाराज यांचे गुलालाचे कीर्तन होणार आहे. यानंतर उपस्थितीत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. जन्मोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली आहे.

बातम्या आणखी आहेत...