आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दृष्टिदान दिनानिमित्त 16 जूनपर्यंत सप्ताहात विविध कार्यक्रम ; केंद्र शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्रविभाग, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १० जून ते १६ जून २०२२ या कालावधीसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टिदान दिन सप्ताहाचे उद़घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड व जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील उपस्थित होते. यावेळी स्त्री रुग्णांलयाच्या वैदयकीय अधिक्षक डॉ.स्मिता गवळी, डॉ. ईस्माईल मुल्ला, डॉ.सुधीर सोनटक्के, डॉ.संजय सोनटक्के, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.मुस्तफा पल्ला , डॉ.महेश पाटील, डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ ज्योती कानडे तसेच अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रामराजे बिडवे, जिल्हा रुग्णालयातील विविध विभागाच्या सर्व वॉर्ड इन्चार्ज व अधिपरीचारिका, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज वहिदा शेख, तसेच सर्व नेत्रविभागातील अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना शासकीय वैदयकिय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड म्हणाले की, नेत्रदान ही महत्वाची प्रक्रिया असून अवयवदान व देहदान बाबत चळवळ उभी करणे हि एक काळाची गरज आहे. याबाबतीत येणाऱ्या कालावधीत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा अधिष्ठाता डॉ.संजय राठोड सर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संतोष पोतदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टॉफ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी उपस्थित सर्वांना डॉ.भालचंद्र यांनी केलेल्या अंधत्व निर्मुलनाच्या केलेल्या कार्याचा गौरव केला. या सप्ताहाच्या कालावधीमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृतीबरोबरच जास्तीत जास्त रुग्णांची नेत्रतपासणी करण्याबाबत आवाहन केले. येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान होणार आहे. पुढील तीन वर्षात मोतिबिंदू शस्त्रक्रिया अनुशेष भरुन काढून मोतीबिंदुमुळे असलेले अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...