आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आदर्श विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा, दहावी विद्यार्थ्यांना निरोप व मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सोमशंकर महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे तहसिलदार शिवाजी कदम , श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे व कवी कमलाकर भोसले , माजी प्राचार्य मन्मथ माळी , मुख्याध्यापक शिवराज औसेकर , पर्यवेक्षक बी.एम पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी तहसिलदार श्री.कदम म्हणाले की , विद्यार्थी आयुष्यभर आपली शाळा विसरू शकत नाही.
शाळेनी दिलेली ज्ञानाची शिदोरी व संस्कार याच्या आधारेच आपण जगाच्या आकाशात उंच भरारी घेण्याचे बळ मिळते , आजचे मेहनतीने मिळवलेले मार्क , गुण हेच उदयाचे सद्गुण आहेत , चांगल्या मित्रांमुळे सद्गुणांचा संग्रह वाढतो म्हणून चांगले मित्र निवडा असे श्री.कदम म्हणाले . यावेळी कवि कमलाकर भोसले , प्राचार्य सोमशंकर महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून नवीन जाधव तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून कु .स्नेहल सुर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पारितोषिकांचे वाचन सुनिता बारसकर, निर्मला चिकुंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्याराव फडताळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.