आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक प्रवचन:पवित्र पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ; भक्तिसंगीत व भजनांचा नित्य सोहळा

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्युषण पर्व निमित्त नळदुर्ग शहरातील जैन मंदिरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्युषण पर्वात प्रामुख्याने पाच तत्वांचं पालन केले जाते. सत्य म्हणजे खरं बोलणे, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रम्हचर्याचं पालन करणे आणि अपरिग्रह अर्थात गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे या तत्वांचा समावेश आहे. सामान्य शब्दात पर्युषण म्हणजेआपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांपासुन सुटका. ३१ ऑगस्ट पासून हे महापर्व सुरु झाले आहे.हे महापर्व ९ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जैन मंदिरात रोज भगवंताचा अभिषेक, कुंभ मिरवणुक, भक्तामर दिप विधान होऊन रोज विविध धार्मिक विषयांवर प्रवचन होत आहे.तसेच रात्री ७-३० वाजता भक्तिसंगीत व भजनांचा नित्य कार्यक्रम होत आहे. चातुमार्सात येणाऱ्या या पावन पर्युषण महापर्वात समाजातील लहानथोर महिला-पुरूष भाविक उपवास करतात. भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...