आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.४) नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येऊन हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
नगरपंचायत च्या सभागृहामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय यांच्या प्राचार्य,मुख्याध्यापक यांनी उपस्थिती होती. यावेळी मुख्याधिकारी गिरीश पंडित, नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड,उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी केंद्र सरकार च्या सूचनांनुसार "हर घर तिरंगा" अभियान दि.१३ऑगस्ट ते दि.१५ ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येऊन २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचा निर्धार असल्याचे सांगितले. हे अभियानाच्या माध्यमांतून यात लोकसहभाग वाढऊन ध्वजाचा योग्य सन्मान राखावा,देशभक्ती भावना जनमानसात ठेवण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.