आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय प्रतिसाद:वाशी प्रीमियर लीग पर्व तीनचे  जल्लोषात उद्घाटन ; हजारो रुपयांचे उत्तेजनार्थ ठेवण्यात आली बक्षीसे

वाशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी प्रीमियर लीग पर्व तीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.येथील बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील दोन लीग मध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे याहीवर्षी पर्व तीनमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आयपीएल प्रमाणे वाशी प्रीमियर लीग मध्ये संघ मालक व संघाना सहभाग नोंदवता येऊन सामने खेळवले जात आहेत. यावर्षी माजी नगराध्यक्ष नितीन चेडे यांच्याकडून विजेत्या संघास ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर उपविजेत्या संघास माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी व बिभीषण खामकर यांच्यावतीने ३१ हजाराचे पारितोषिक दिले जाणार आहे.

या बरोबर विरोधीपक्ष गटनेते नागनाथ नाईकवाडी, दत्तात्रय कवडे,नगरसेवक शिवहर स्वामी,उद्योजक विठ्ठल चौधरी,सिध्देश्वर भालेकर, उद्योजक विशाल कवडे यांच्या वतीने ११ हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत. एकूण १ लाख ४० हजाराची उत्तेजनार्थ वैयक्तिक रोख स्वरूपाची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. नगरसेवक दिग्विजय चेडे,नगरसेवक नितीन गवारे,पंचायत समितीचे माजी सभापती विष्णूपंत मुरकुटे,माजी सभापती शामराव शिंदे आयोजक संतोष चेडे,संकेत कवडे यांच्या उपस्थतीमध्ये उद्घाटन पार पडले.

बातम्या आणखी आहेत...