आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:वाशी वि. का. सोसायटी निवडणूक बिनविरोध

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील १२ जून रोजी होणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गुरुवारी (दि.२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज राहिले असून उर्वरित इच्छुक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले.

येथील सोसायटी निवडणुकीसाठी ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, त्याला यश आले. यासाठी शिवसेनेचे प्रशांत चेडे, भाजपचे सुरेश कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र कवडे यांनी पुढाकार घेतला. भाजपाचे सहा, शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादीचे तीन संचालक बिनविरोध निवडून आले. सोसायटीचे नूतन संचालक म्हणून सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघामधून नानासाहेब मोहनराव कवडे, सुभाष सदाशिव जगताप, अरुण कल्याण कवडे, संभाजी निवृत्ती उंदरे, बालाजी गौतम कवडे, दत्तात्रय देविदास कवडे, मधुकर गोपाळ जगताप, सूर्यकांत शहाजीराव सांडसे, महिला राखीव मतदार संघामधून रत्नमाला सदाशिव पवार,इरफाना जुबेर काझी , इतर मागास वर्ग मतदारसंघामधून शिवशंकर गणपतराव चौधरी, अनुसुचित जाती/जमाती प्रवर्ग मतदारसंघातून बाळासाहेब पंडितराव सुकाळे, भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघातून प्रद्युम्न बळीराम केळे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीची घोषणा होताच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. डी. कदीरे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...