आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:वात्सल्य संस्थेमुळे मंगरूळ परिसरातील लोकांची वाचन चळवळ समृद्ध होईल; लोकायुक्त अंबादास जोशी यांचे प्रतिपादन

तामलवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वात्सल्य सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या ग्रंथालयामुळे मंगरूळ परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, नागरिक यांच्यात वाचनाची चळवळ समृद्ध होण्यास मदत होईल असे प्रतिपादन गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले.

मुळचे पुण्याचे आणि सध्या सिडनी ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक असलेले शरद कानिटकर यांनी त्यांच्या आईंच्या मृत्यूपश्चात वात्सल्य सामाजिक संस्थेस ग्रंथालय उभे करण्यास मदत केली आहे. संस्थेने मालती-माधव स्मृती ग्रंथालय असे नाव ग्रंथालयास दिले आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रणिता शेटकार म्हणाल्या की, ग्रंथालयात ऐतिहासिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कथा, कादंबऱ्या तसेच वैचारिक,कला-क्रीडा आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सर्व पुस्तके समाविष्ट करून सुसज्ज ग्रंथालय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तुळजापूर येथील सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ बाबा,व्यंकट अरण्य महाराज,ॲड.तानाजी जगताप उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...