आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य; गणरायाच्या मूर्ती, आरास साहित्याने कळंब नगरी फुलली

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच तयारीला लागले आहेत. येथील बाजारपेठेत विनायकाच्या लहान व मोठ्या मूर्तींसह आरास करण्यासाठीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. गणेशोत्सव हा बाळगोपाळांपासून वयोवृद्धांचा आवडता उत्सव आहे. घरांसह सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांकडून गणेशाची स्थापना करुन दहा दिवस आराधना केली जाते. गणेशोत्सवात गावागावत उत्साहाचे वातावरण असते. मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे उत्सवावर निर्बंध होते. आता सर्व निर्बंध हटल्याने सर्वजन गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.

नागरिकांनी गणरायाच्या मूर्तींसह सजावटीसाठी लागणाऱ्या आरास साहित्याची खरेदी करण्यासाठी येथील बाजारपेठेत गर्दी केली आहे. शहरातील बाजारपेठेत उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत माळा आणि विविध फुलांच्या माळांनी उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील मेन रोडवरील बाजारपेठेत गणेशाच्या आकर्षक मूर्ती विक्रीकरिता आल्या आहेत. येथे मूर्ती विक्रीचे जवळपास १५ स्टॉल लागले आहेत. यावर्षी अनेक गणेश मंडळांच्या मोठी गणेशमूर्ती घेण्याकडे कल दिसून येत आहे.
१० ते १५ टक्क्यांची किंमतवाढ

यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणपती बाप्पाची मूर्ती आवर्जून बसवली जाते. त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. सजावटीसाठी लागणारे झालर, विविध आकाराचे कापडी कमान, फुले, माळा, गळ्यातील हार आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...