आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा:साहित्य विक्री करत असलेला व्हिडिओ व्हायरल; पुस्तक विक्री करणाऱ्या शाळेचा शिक्षण विभागाकडून पंचनामा

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ जून रोजी पालकांच्या तक्रारीवरुन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी विद्यामाता हायस्कूल येथे जाऊन शालेय साहित्य विक्री करत असलेला व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर शाळेतील पुस्तके, वह्या, गणवेश विक्री बंद करून गट शिक्षण अधिकारी संजीव बागल यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती.

त्याची दखल घेत १७ जून रोजी गट शिक्षणाधिकारी संजीव बागल, विस्तार अधिकारी हाके यांनी शाळेत जाऊन पुस्तके विक्री करत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून शाळेला लेखी स्वरूपाची मागणी केली. तसेच शाळेवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, विद्यार्थी सेनेचे पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...