आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्याच्या सीमेलगतच्या कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुका व बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण या दोन विधानसभा मतदारसंघातील प्रचारासाठी उमरगा येथे सभा, बैठका घेण्यात येत आहेत. सीमेलगतच्या कर्नाटकातील जवळपास २० गावांचे बरेच मतदार व्यवसायानिमित्त उमरग्यात स्थायिक झालेले आहेत.
यामुळे प्रचार सुरू आहे. कर्नाटकच्या सीमेवरील उमरगा तालुका असल्याने येथे कर्नाटकातील अनेक गावातील लोक स्थायिक झाले आहेत. कर्नाटकातील एकंबा, जामगा, उजळंब, गदलेगाव, वडरगा, आळंगा, मन्नाळी, व्हनाळी, चिट्टा, मंठाळ नंदगुर, बटगीर, शिरगुर, लाडवंती, घोटाळ, जाजनगुगळी, कोपनहिप्परगा, खजुरी, होदलुर, आणूर, तडोळा, प्रतापुर आदी सीमेलगत असलेल्या गावातील बहुतांश नागरिक उद्योग व्यवसायानिमित्त आणि मुलांच्या शिक्षणासाठी उमरगा शहरात वास्तव्यास आहेत.
आळंद आणि बसवकल्याण दोन्ही मतदारसंघातील जवळपास दीड ते दोन हजार मतदार असून मतदारांशी संपर्क साधण्यासाठी ज्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. आळंद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बी. आर. पाटील यांनी नुकतीच शहरातील आईसाहेब मंगल कार्यालयात मतदारांची सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा संगीताताई कडगंचे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे शिवकुमार सिंग, निसार अहमद अलम, सोलापूर काँग्रेसचे धवलसिंह मोहिते-पाटील, आळंदचे विजयकुमार हासुरे यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
शेतरस्त्यांचा वापर
कर्नाटकात विविध विकास कामांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ठेकेदारांवरही जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. कर्नाटकातील सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत असल्यामुळे रसद पुरवठा करण्यासाठी दोन राज्यांच्या सीमेदरम्यानच्या पाणंद व शेतरस्त्यांचा वापर केला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.