आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:उस्मानाबाद बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी विजयकुमार माने; सदस्यपदी ॲड. माळी, ॲड. जहागीरदार, काळुंके, ॲड. भोसले यांची निवड

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीची राज्यपालांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्षपदी विजयकुमार माने यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी ॲड. दिपाली जहागीरदार, ॲड. मैना भोसले, दयानंद काळुंके, ॲड. सुजाता माळी यांची निवड झाली. बालकांची काळजी व संरक्षणासाठी राज्य शासनाच्या अधिनियमानुसार ही समिती गठीत करण्यात आली. समितीचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे. याबाबत लातूर येथे काही महिन्यापूर्वी मुलाखती झाल्या होत्या.

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २ जून रोजी आयुक्त कार्यालयाने यादी जाहीर केली. या समितीत विधी व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्थान दिले गेले. समितीच्या अध्यक्ष विजयकुमार माने व सदस्य दयानंद काळुंके यांनी सामाजिक क्षेत्रात तर ॲड. दिपाली जहागीरदार, ॲड. मैना भोसले, ॲड. सुजाता माळी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ८ जून रोजी जुन्या समितीला निरोप तर नवीन समितीतील अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत करुन कार्यभार सोपवण्यात आला. दस्तऐवजांचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी एस. व्ही. अंकुश, जिल्हा पर्यविक्षा अधिकारी शिरीष शेळके,पर्यविक्षा अधिकारी इरकल,पर्यविक्षा अधिकारी व्यंकट देवकर, बालकल्याण समिती सदस्य व सेवानिवृत्त अधिकारी नंदकिशोर कोळगे, बालकल्याण समीतीचे मावळते अध्यक्ष अश्रुबा कदम, बालकल्याण समितीच्या सदस्य कस्तुरा कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...