आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:विकासासाठी गावातील नागरिक, अधिकारी, संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन

बार्शी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या विकासाचा वेग वाढलाय. शहरे बदलताहेत. पुढील १५ वर्षांत देशातील सर्व शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील. या देशात ६ लाख ४८ हजार खेडी आहेत. गावातील अधिकारी, व्यावसायिक, नागरिक, संस्था या सर्वांनी आपाआपल्या गावांच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अध्यक्षीय मनोगतात केले.

येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शासनाच्या उच्चपदी पदोन्नती व नेमणूक मिळालेल्या बार्शीच्या सुपुत्रांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, प्रांताधिकारी हेमंत निकम, सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. परंतु वेळ हे मानसिक बंधन आहे. ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो. त्या भूमीसाठी काम करण्याची, दायित्वाची भावना असेल तर वेळ मिळू शकतो. सहआयुक्त संतोष डुरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. राज्यात सर्वाधिक अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील व त्यात बार्शी तालुक्यातील आहेत. मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...