आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:त्रिकोळीत ग्रामविकास परिवर्तन पॅनल विजयी

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील त्रिकोळी येथील ग्रामपंचायतच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने एकहाती सत्ता संपादन केली असून सरपंच पदासह सर्वच्या सर्व नऊ जागावर दणदणीत विजय संपादन केला आहे . उमरगा शहरातील अंतूबळी पतंगे सभागृहात मतमोजणी पार पडली.

भाजपा पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. सरपंच पदासाठी भाजपा पुरस्कृत व कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेल यांच्यामध्ये चुरस होती. भाजपा पुरस्कृत पॅनेलच्या मुद्रिकाबाई सुरवसे यांनी कॉंग्रेस पुरस्कृत कस्तुरबाई काळे यांचा ८८१मतानी पराभव केला मुद्रिकाबाई सुरवसे यांना ११८० तर कस्तुरबाई काळे यांना २९९ मते मिळाली.

विजयी झालेले सदस्य पुढील प्रमाणे - कंसात मिळालेली मते
१) दयानंद पाटिल ( २८४ ) , २) छायाबाई बिराजदार (३०३ ) , ३) सत्यभामा मुगळे (३५०) , ४) शिवाजी सुरवसे ( ३६७) ,५) सुवर्णा शिंदे (३८७) , ६) महानंदा हंगरगे (३४२) , ७) विजयकुमार कांबळे (३८२) , ८) शिवराज बिराजदार ( ३०५) , ९) कार्तिका कोडगीर (३८५)

बातम्या आणखी आहेत...