आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:योजनांची गावोगांवी‎ कलापथकाद्वारे जागृती‎

तुळजापूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या अनुसूचित जाती‎ उपाययोजनांतर्गत सामाजिक न्याय‎ विभागाच्या विविध योजनांची‎ महिषासूरमर्दिनी सांस्कृतिक लोक‎ कलामंचच्या वतीने जनजागृती‎ करण्यात येत आहे.‎ जिल्हा माहिती उपविभागीय‎ अधिकारी युवराज पाटील व‎ जिल्हा माहिती कार्यालयाच्या‎ मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय‎ विभागाच्या विविध योजनांची‎ तुळजापूरचे कलापथक‎ नागरिकांमध्ये जागृती करत आहे.‎

या कला पथकाचे प्रमुख शाहीर‎ राजेंद्र गायकवाड (गोंधळी)‎ आणि त्यांचे सहकारी तुळजापूर,‎ उमरगा, लोहारा या तालुक्यांतील‎ तुळजापूर व उमरगा शहरासह‎ तुरोरी, कदेर, येळी, माडज,‎ सास्तूर, सालेगाव, हिप्परगा,‎ धानोरी, लोहारा शहर, चिकुंद्रा व‎ अपसिंगा आदी गावांमध्ये जाऊन‎ जनजागृती करण्यात येत आहे. या‎ पथकामध्ये शाहीर राजेंद्र‎ गायकवाड, मीरा गायकवाड,‎ लक्ष्मण देडे, विजय मोरे, तानाजी‎ देडे, रामचंद्र ढेकळे, दिलीप‎ कोल्हे, करण कांबळे, भैरू डवरी,‎ हनुमंत मोरे आदी कलाकारांचा‎ सहभाग आहे.‎

बातम्या आणखी आहेत...