आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विनायकराव पाटील यांचे उपोषण सुरू

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी समाजसेवक शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी बुधवार (३१) पासून कवठा सेवाग्राम येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व गोगलगायीमुळे नुकसान झालेले आहे विशेष विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्याला नुकसान भरपाई देण्यापासून वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईत समावेश करावा व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी नेते श्री पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना खरीप नुकसान भरपाई पोटी हेक्टरी २५ हजार रूपये देण्यात यावेत या प्रमुख मागणी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा अन्यथा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये दहा दिवस सदर उपोषण सुरूच राहाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...