आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूम राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा निषेध:पंचायत समितीपासून हलगी वाजवत प्रतिमेला जोडे मारत तीव्र आंदोलन

भूम5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन भूम शहरातील गोलाई चौकात करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. भूम पंचायत समिती कार्यालयापासून हलगी वाजत निषेध रॅली काढत भूम शहरातील गोलाई चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मधुकर मोटे,तालुका अध्यक्ष हनुमंत पाटुळे, संचालक आण्णा पाटील, कृष्णापूरचे सरपंच अतुल शेळके, रामेश्वरचे उपसरपंच श्रीराम खंडागळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती रमेश मस्कर, भाऊसाहेब चोरमले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...