आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:उस्मानाबादेत ज्येष्ठांसाठी उभारणार विरंगुळा केंद्र ; निधी लवकर उपलब्ध करुन देण्यात येणार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शहरातील समता नगरात मारुती मंदिरासमोरील विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत या विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

भविष्यातील शहराचा विचार करुन तो साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, लोमटे महाराज, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नायगावकर काका, विनायकराव देशमुख, अॅड. दिलीप पाटील, अत्रे, गटनेते सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, माजी नगरसेवक प्रदीप घोणे, पंकज पाटील, नाना घाडगे, पंकज पडवळ, चेतन वाटवडे, सुनिल कोळी, बाळासाहेब वरुडकर,नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...