आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांची माती परीक्षण केंद्राला भेट; या वेळी विद्यार्थ्यांना डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आलेल्या माती परीक्षण केंद्राला शनिवारी (दि. १४) रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माती परीक्षण कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक करून बघितले. या वेळी विद्यार्थ्यांना डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची उत्पादनक्षमता वाढावी, यासाठी मातीचे परीक्षण करून कोणते पीक घ्यावे याविषयी माती परीक्षण केंद्राच्या वतीने मार्गदर्शन केले जाते. माती परीक्षण केंद्रात यावर्षी तालुक्यातील २०० शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेत आपल्या शेतीची मृदा आरोग्य पत्रिका तयार केली आहे. याचा फायदा पुढील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास माती परीक्षण केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या केंद्राच्या वतीने केल्या जाणाऱ्या माती परीक्षणाविषयी माहिती घेतली आणि स्वतः प्रात्यक्षिक करून पाहिले.

नत्र, स्फुरद, पालाश, सामू आणि सेंद्रीय कर्ब हे मातीतील घटक कसे ओळखावेत आणि त्याचे मातीतील प्रमाण कसे काढले जाते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यावेळी डॉ. सूर्यवंशी, डॉ. अर्जुन कटके यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. डी. बी. ढोबळे, डॉ. डी. एस. चिट्टमपल्ले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...