आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नॅकच्या पथकाची भेट; त्रिसदस्यीय समितीकडून गुणवत्ता तपासणी

उमरगा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालयात उपलब्ध पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, वापरण्यात येणाऱ्या पद्धती व संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या पदवीनंतर मूल्यमापन, प्रशासन व व्यवस्थापन सुविधांची माहिती व आढावा घेऊन शिफारशी करण्याचे कार्य नॅक समिती करते, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे माजी कुलपती प्रा. नीलमणी प्रसाद वर्मा यांनी व्यक्त केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक), बेंगळुरु यांच्या गुणवत्ता तपासणी संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीने १६-१७ जून दरम्यान महाविद्यालयास भेट देऊन शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. त्रिसदस्यीय समितीचे प्रा. नीलमणी वर्मा, समन्वयक सदस्य प्रा. रामबल्लव रॉय गोवा विद्यापीठ आणि सदस्य म्हणून जवाहरलाल नेहरू राजकीय महाविद्यालय पोर्ट ब्लेअरचे माजी प्राचार्य प्रा. नीलम झेवियर यांनी काम केले. महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी कॅडेट्सनी मानवंदना देऊन स्वागत केले.

समितीच्या व्यवस्थापनाबरोबर बैठकीत भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे व संचालक मंडळाने सहभाग घेतला. समितीने आपल्या पाहणी दरम्यान परिसरात वृक्षारोपण केले. एक्झिट मीटिंगमध्ये पाहणी समितीचा अहवाल प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, आयक्युएसी समन्वयक उपप्राचार्य संजय अस्वले यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य प्रा. डॉ धनाजी थोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, महाविद्यालय कोर्स समन्वयक, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

सुविधांची केली पाहणी
प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थ्यांशी समितीने संवाद साधला. महाविद्यालयातील विविध विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, एनएसएस, एनसीसी इतरही विद्यार्थी सेवा केंद्राला भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...