आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:जकेकुरवाडी शाळेस अध्ययन संस्थेची भेट

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात जकेकुरवाडी जिल्हा परिषद शाळेला मुंबई अध्ययन संस्था संचालित अध्ययन विकास कार्यक्रमांतर्गत धनराज गाडेकर यांनी शनिवारी (दि.३१) भेट देवून अध्ययन क्षमता चाचणीसह विविध माहिती घेवून मार्गदर्शन केले.

शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत विभाज्यता या घटकाचे शिक्षक प्रशिक्षण व पूर्वचाचणी घेण्यासाठी अध्ययन संस्था मुंबई व प्राथमिक शिक्षण विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता सहावी व सातवी विद्यार्थ्यांसाठी शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. यावेळी द्वितीय सत्रात विभाज्यता हा घटक घेवून सुरवात केली.

धनराज गाडेकर यांनी द्वितीय सत्रात सहावी व सातवी विद्यार्थ्यांसाठी विभाज्यता घटक माहिती दिली. २६ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीत विद्यार्थ्याची गणित विषयाची पूर्व चाचणी घेवून तपासणी केली. यावेळी गाडेकर यांनी शालेय परिसर, वातावरण अभिलेख, विद्यार्थी गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षक प्रमोद साखरे, प्रमोद मोरे व विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील सहावी आणि सातवीच्या शिक्षकांचे विभाज्यता घटकाचे प्रशिक्षण ६ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...