आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:वडगाव येथे उद्या विठ्ठल पुरस्कार सोहळयाचे आयोजन ; साहित्य वाटप करण्यात येणार

उस्मानाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडगाव (सि.) येथील सिद्धेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ११) वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने विठ्ठल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील २४ मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असून ११ गावातील विविध भजनी मंडळींना टाळ, विना व भजनी साहित्याचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होईल. वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज अध्यक्षस्थानी असतील. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, राहुल पाटील, कळंबचे भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, मनसे शेतकरी सेनेचे शाहूराज पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विविध २४ मान्यवरांना विठ्ठल पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगाचार्य, उद्योजक वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिला जाईल. कार्यक्रमास जिल्हाभरातून वारकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष मोहन वाघुलकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...