आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेमवारी वैकुंठ एकादशीनिमित्त पूर्वभागातील व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची माेठी गर्दी हाेती. मंदिर विविध फुलांनी सजवले हाेते. उत्सवमूर्तींना अलंकृत करण्यात आले हाेते. जुना विडी घरकुलच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात पांडुरंगाला तिरुपतीचे रूप देण्यात आले हाेते. बाजूलाच उभ्या माता रुक्मिणी पद्मावती अम्माच्या रूपात हाेत्या. तिथेही दर्शनासाठी भक्तगण माेठ्या संख्येने हाेते. दत्तनगरातील बालाजी मंदिरात सकाळपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या हाेत्या. विशेष दर्शनासाठी देणगीने प्रवेश येत हाेता.
सामान्य भक्तमंडळी रांगेतच उभे राहून भगवंतापुढे लीन झाली हाेती. रात्री नऊपर्यंत भक्तांची गर्दी हाेती. उत्सवमूर्तींच्या पालखीसेवेने वैकुंठ एकादशी उत्सवाची सांगता झाली.
तीर्थक्षेत्र पंढरी हे भूवैकुंठ पांडुरंग भक्तीचा भुकेला पांडुरंगाचे स्थान असलेले पंढरपूर हे भूतलावरील वैकुंठच आहे. पुत्रदा एकादशी अर्थातच वैकुंठी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन पुण्यप्रद असते. विठुमाऊली हा भक्तीचा भुकेला आहे. त्याला शरण गेलेला सामान्य भक्तही थेट चरणांवर माथा टेकून येताे. असे दर्शन देशात कुठेच नाही, असे हभप राकेश महाराज अन्नम यांनी सांगितले. घरकुलमधील विठ्ठल-रखुमाई मंदिरासमाेर साेमवारी सायंकाळी त्यांचे प्रवचन झाले. त्यांना एेकण्यासाठी विडी कामगार महिलांची माेठी गर्दी हाेती. आरतीने वैकुंठ उत्सवाची सांगता झाली. या वेळी अध्यक्ष विवेकानंद चन्ना, सचिव वासुदेव यलदंडी यांच्यासह राजू कुडक्याल, महेश ताटी, प्रशांत बिनगुंडी, विठाेबा कैरमकाेंडा, शिवकुमार दिड्डी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.