आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नारंगवाडीत तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी मतदान ; सर्वाधिक मते घेऊन संजय पवार अध्यक्ष

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नारंगवाडी ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त गाव समितीच्या पुनर्गठणासाठी गुरुवारी ग्रामसभा बोलावली होती. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने सरपंच कविता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत मतदान घेऊन तंटामुक्त अध्यक्षाची निवड झाली. यात संजय पवार सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले.

कुणीही अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी ग्रामसभेला उपस्थित ११४ ग्रामस्थांनी सात उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया घेवून निवड केली. समितीच्या अध्यक्षपदासाठी सात उमेदवारांना मतदान करण्यात आले. त्यामध्ये संजय पवार यांना ५६ मते पडली. दयानंद पवार यांना ३८ मते, शंकर मुगळे यांना सात, प्रशांत सांगवे यांना सहा, गजेंद्र मुळे यांना पाच, हनुमंत सांगवे यांना एक तर बंडु पवार यांना एक मत पडले. दुसऱ्या क्रमांकाची मते दयानंद पवार यांना मिळाल्याने उपाध्यक्ष करण्यात आले.

यावेळी पोलिसपाटील हेमंतराव पाटील, ग्रामसेवक जगदीश जाधव, ग्रापं सदस्य कुमार पवार, भीमाशंकर माळी, वंदना पवार, चंद्रकांत कांबळे, अरविंद पवार, सेवा सोसायटीचे चेअरमन महावीर पवार,चंद्रकांत पवार, राजेंद्र चव्हाण, पी. व्ही. पवार, महेश पवार, भगवान पवार, निवृत्ती चिकुंद्रे, दत्तु कोकाटे, जनार्धन आष्टे, व्यंकट सांगवे, जयहिंद पवार, हनुमंत पवार, समाधान पवार, राहुल मुगळे, खंडु पवार व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...