आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी पूर्ण:23 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; 408 कर्मचाऱ्यांसह पोलिसही रवाना

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) मतदार होणार आहे. २३ सरपंचपदासाठी ६९ तर २३३ सदस्यांसाठी ५२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील महालिंगरायवाडी येथे सात सदस्य अविरोध निघाले असून सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.

तालुक्यात ५५ हजार ९७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकुरगा / एकुरगावाडी, माडज, नारंगवाडी, येणेगूर, आलूर, कोथळी, भुयार चिंचोली / काटेवाडी, सुंदरवाडी आदी गावात चुरशीच्या लढती होत आहेत. नऊ गावात दुरंगी, आठ गावात तिरंगी लढती होत आहेत. काही गावात युवक व सत्ताधारी यांच्यामध्ये लढत होत आहे. निवडणूक विभागाने शनिवारी (दि.१७) येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र, मतदान कक्षात आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप केले.

सात बस, तीन खासगी वाहनांद्वारे मतदान केंद्रानुसार संबंधित गावांकडे रवाना केले आहे. पदनिर्देशन तथा प्रभारी तहसीलदार रतन काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शिवाजी कदम, स्वामी, सगर यांच्यासह निवडणूक अधिकारी, सहायक अधिकाऱ्यांनी शनिवारी निवडणूक होत असलेल्या २३ ग्रामपंचायतींच्या १०२ मतदान केंद्रासाठी ४०८ कर्मचारी आणि ११० पोलिस, होमगार्ड नियुक्त केले आहे. २५ अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायत मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य बसने पाठवले
२३ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी ६९ आणि २३३ सदस्यपदासाठी ५२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शनिवारी १०२ मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी, आवश्यक साहित्य वाटप करून वाहनातून मतदान केंद्रावर पाठवले आहे. काही संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...