आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:लोहारा 12 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होत आहे. नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या दिवशी वडगाव (गांजा) ग्रामपंचायत अविरोध निघाली. त्यामुळे सास्तूर, जेवळी (उ.), माकणी, नागुर, विलासपूर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. लोहारा तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली.

४७ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन केंद्र अधिकारी राहणार असून एक पोलिस कर्मचारी व शिपाई राहणार आहेत. शनिवारी (दि.१७) दुपारी नियोजित सहा बसमधून सर्व मतदान यंत्रे त्या-त्या मतदान केंद्रावर पाठवण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी, मतदान केंद्रावरील अधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी झोनल ऑफिसरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आवश्यक ते कर्मचारी नियुक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...