आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:वाकडी (के) जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाकडी (के) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी केली. विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. सकाळी गावकऱ्यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यपिका घोळवे, सरपंच परिमाळा कोल्हे, उप सरपंच तुकाराम कुरूंद, लक्ष्मण कोल्हे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे , शिक्षक जे.पी.गुरव, डी.आर. वायकर, बापूराव कोल्हे, चंद्रकांत जाधव,बाबासाहेब रणदिवे सर्व सदस्य माजी विद्यार्थी, पालक व गावकरी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये व्यवाहारिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच व व्यवहारातून समृद्धीकडे सर्वांचा प्रवास व्हावा अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका एस.बी. घोळवे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...