आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला माकणी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून सतत जलवाहिनी फुटत असल्याने भर उन्हाळ्यात १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे येथील काळे पॉटमधील महिलांनी गुरुवारी (दि.१२) पाण्याठी नगरपरिषदेसमोर ठिय्या दिला. यावेळी महिलांनी पालिकेची अधिकारी तुळशीदास वराडे यांच्यासमोर पाण्यासह स्वच्छतेची समस्या मांडली.
सहा वर्षांपूर्वी कार्यान्वित जालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनी फुटीचे व गळतीचे ग्रहण थांबले नाही. मागील महिनाभरात विंधन विहिरीवरील विद्युतपंपात बिघाड झाला होता. दोन दिवसांपूर्वी जकेकूर शिवारात जलवाहिनी खराब झाल्याने पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत आहे. शहरातील काळे प्लॉट भागात नळाला पाणी येत नसल्याने उन्हाळ्यात महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनी फुटल्याचे सांगून शुक्रवारी सकाळी पाणी सुरू करण्याचे व परिसरात स्वच्छता करण्याची ग्वाही दिल्यानंतर महिलांनी ठिय्या सोडला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. माकणी तलावात मुबलक पाणीसाठा असूनही अधुनमधुन जलवाहिनी फुटणे व गळतीची समस्या वारंवार घडत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पालिकेतील पाणीपुरवठा विभागात तज्ञ कर्मचारी व अपुरे मनुष्यबळ असल्याने शहरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
नगरपरिषदेचे शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
परंतु पालिकेचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे महामार्गालगत थांबलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजनेच्या गळतीची समस्या कायम आहे. अंतर्गत गटारीचा प्रश्न तसाच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.