आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट जनतेतून सरपंच निवडणार:वांगी (खु), वारेवडगांव-कासारी 18 डिसें रोजी मतदान, निकाल दोन दिवस उशिरा

भूम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तालुक्यात पाच वर्षापुर्वी थेट जनतेतून निवडणूक झालेल्या वांगी(खु) व वारेवडगांव - कासारी या दोन गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका थेट जनतेतून सरपंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे.

१८ डिसेंबरला होणार मतदान ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर २० डिसेंबरला झालेल्या मतमोजणी केली जाणार आहे. परंतु मतदानानंतर निकालासाठी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गावचा पुढारी आणि सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी मतदानानंतर गावकऱ्यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...