आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:उमरगा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात २३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने शुक्रवारी (दि.५) सन २०११ च्या जनगणनेनुसार संबंधीत गावातील ग्रामसभेत वॉर्डानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाचा निर्णय ओबीसींना संधी देण्याचा झाल्याने शुक्रवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत तलाठी यांचे उपस्थितीत आरक्षण सोडत घेण्यात झाली. एकूण २३ ग्रामपंचायतीच्या ८४ प्रभागातील २३३ सदस्यांपैकी ३४ जागांवर ओबीसींचे आरक्षण निश्चित झाले असून त्यात १८ जागा पुरुषांना तर १६ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी २१, अनुसूचित जाती महिलेसाठी २५ आणि अनुसूचित जमाती महिलेसाठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण ६६ आणि सर्वसाधारण महिलांसाठी ८४ जागा आरक्षित झाल्या आहेत. ओबीसीला आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील या गावांमध्ये होणार ग्रामपंचायतीची निवडणूक
डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या २३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये भुसणी, बेळंब, चिंचोली (जहागीर), कंटेकुर, कलदेव निंबाळा, त्रिकोळी, कोथळी, धाकटीवाडी, चिंचोली (भूयार), औराद, येणेगुर, एकुरगा, कोराळ, नारंगवाडी, केसरजवळगा, आलूर, माडज, मळगी, वरनाळवाडी, सुंदरवाडी, मळगीवाडी, आनंद नगर, महालिंगरायवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नगरपरिषदेत ओबीसी आरक्षण नसणार!
बदलत्या राजकीय घडामोडी, कुरघोडी आणि न्यायालयीन निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ओबीसींना आरक्षण दिले गेले आहे. आता लवकरच होणाऱ्या २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही ओबीसींना आरक्षणाची संधी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने नगरपालिकेत आरक्षण मिळणार नसल्याचा निकाल दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आमच्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळाल्याचे सांगणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकार आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गप्प का आहेत? असा सवाल पालिका निवडणुकीसाठी तयारी केलेल्या विविध पक्षातील ओबीसी इच्छूक उमेदवारांकडून केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...