आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:वारेवडगाव-कासारी ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वारेवडगाव-कासारी ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडून सत्तांतर झाल्यापासून तालुक्यात स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीची प्रथम निवडणूक होत आहे. वारेवडगाव-कासारी ग्रामपंचायतीचे ९ सदस्य व एक सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.

निवडणूक थेट जनतेतून सरपंच पदासाठी असल्याने रंगत वाढली आहे. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडून सत्तातंर झाल्यापासून तालुक्यातील स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतची ही निवडणूक प्रथमच होत आहे. वारेवडगाव - कासारी ग्रामपंचायतचे नऊ सदस्य व एक थेट सरपंच पद या साठी निवडणूक होत आहे. वारेवडगांव येथील सहा सदस्य व कासारी येथील तीन सदस्य निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गाव पातळीवरील पुढाऱ्यांच्या बैठका झाल्या असून त्या बैठकीत बिनविरोध निवडणूकीचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. गावपातळीवर होणारी ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर जरी लढवली जात नसली तरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे.

वारेवडगांव कासारी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असला तरी ग्रामपंचायतचे चित्र दि. २ डिसेबर रोजी स्पष्ट होणार आहे. शेवटच्या दिवशी नऊ सदस्यासाठी किती अर्ज दाखल होतात तसेच सरपंच पदासाठीही किती अर्ज दाखल होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी जास्त अर्ज दाखल झाले तर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ७ रोजी बिनविरोधचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शेवटी नऊ सदस्यासाठी नऊच अर्ज व सरपंच पदासाठी एकच अर्ज राहिला तर वारेवडगांव - कासारी ग्रामपंचायतची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...