आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटचाल:वारेवडगाव - कासारी ग्रा.पं. बिनविरोधकडे वाटचाल

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पूर्ण होणाऱ्या भूम तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यात पाच वर्षापूर्वी थेट जनतेतून निवडणूक झालेल्या वांगी(खु) व वारेवडगांव - कासारी या दोन गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका थेट जनतेतून सरपंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे.

भूम तालुक्यातील वारेवडगाव - कासारी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका सरपंच पदासाठी तीन अर्ज तर नऊ सदस्यांसाठी दहा अर्ज दाखल झाले असून यामधील आठ सदस्य बिनविरोध निघत असून औपचारिकता बाकी आहे. एका जागेसाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक लागण्याची शक्यता आहे. तसेच सरपंच पदासाठी तीन अर्ज आल्याने या ठिकाणीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यातील वांगी (खु) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी चार अर्ज दाखल झाले असून ग्रामपंचायत ७ सदस्यासाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत एक जागा बिनविरोध निवडून आली असून याची औपचारिक घोषणा बाकी आहे.

१८ डिसेंबरला होणार मतदान ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे,

तर २० डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. परंतु मतदानानंतर निकालासाठी करावी लागणार आहे दोन दिवस प्रतीक्षा. तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गावचा पुढारी आणि सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी मतदानानंतर गावकऱ्यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. वारेवडगांव - कासारी ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.व्ही.शिंदे तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभय कुलकर्णी हे काम पाहत आहेत. तसेच वांगी (खु)चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. मुंढे तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी.यु . पाटील हे काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...