आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद:वरकटणे हे भविष्यातील केळी हब ; कृषी अधिकारी वाकडे यांचे मार्गदर्शन

पांडे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरकटणे (ता. करमाळा) हे गाव भविष्यात केळी हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केला. ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग (आत्मा) सोलापूर व राजे रावरंभा शेतकरी उत्पादन संस्था करमाळा यांच्या वतीने आयोजित किसान गोष्टी कार्यक्रमात बोलत होते. या वेळी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर परिसंवादात घेण्यात आले. श्री. वाकडे म्हणाले, दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अलीकडील तीन-चार वर्षांमध्ये वरकटणे पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकाची लागवड झालेली आहे. केवळ या परिसरातील लागवडच यशस्वी ठरले असे नसनू ही केळी गुणवत्तापूर्ण असल्यामुळे राज्य तसेच देशाबाहेर या केळीला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी ही निर्यात महत्वाची कामगिरी बजावत, असे ते याप्रसंगी बोलताना म्हणाले. व्यासपीठावर आत्माचे व्यवस्थापक अजयकुमार बागल, सत्यम झिंजाडे, केळी तज्ञ किरण पाटील, दिग्विजय राजपूत, डॉ. विकास वीर, वॉटर संस्थेचे विजय पाटील, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रतीक गुरव, आशिष लाड, सरपंच बापूसाहेब तनपुरे, उपसरपंच अनिल कोकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...