आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कळंब रोड रेल्वे थांबा न दिल्यास आंदोलनाचा इशारा

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबा देण्यात यावा. या भागातील जवळपास १०० गावांतील लोकांची गैरसोय होत आहे. या थांब्यासाठी अनेक वेळा रेल्वे मंत्र्यांकडे देखील पाठपुरावा केला. मात्र रेल्वे प्रशासनाचे अधिकारी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. याच्या पाठीमागे राजकीय शक्तीचा हात असण्याची शक्यता असल्यामुळे येत्या एक महिन्याच्या आत रेल्वे थांबा देण्यात यावा. अन्यथा या भागातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडाप्पा कोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२० नोव्हेंबर रोजी दिला. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तानाजी जमाले, गणेश करंजकर, अजिंक्य भालेराव, तुळशीदास जमाले, तानाजी भालेराव, प्रा. मारुती कारकर, तेजस भालेराव, संजय वाघ, अरुण पाटील, नानासाहेब वाघ आदीसह नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना कोरे म्हणाले की, ऑनलाईन रेकॉर्डवर रेल्वे क्रॉसिंगसाठी ३ ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पोर्ट रेल्वे कर्मचारी स्टाफ दाखविला जात आहे. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म ऑपरेटिंग क्रॉसिंग स्टेशन दाखवत असून सिग्नल व ऑपरेटिंग क्रॉसिंग सेंटर मंजूर आहे.

त्यासाठी मातीच्या भरावाचे काम पूर्ण झालेले असून त्यासाठी खडी, रेल्वे रूळ व स्लीपर हे सर्व साहित्य जागेवर असताना प्रशासनाने येथील सर्व साहित्य बेकायदेशीर व अनधिकृतपणे उचलून नेलेले आहे. तसेच रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या मानदंडानुसार या रेल्वे स्टेशनचे उत्पन्न जास्त आहे. शेंद्री रेल्वे स्टेशनचे उत्पन्न झिरो असताना तेथे थांबा दिला जातो. मात्र कळंब रोड रेल्वे स्थानकावर का स्थान थांबा दिला जात नाही, ही अन्याय कशासाठी लागू केला जातो, असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात अन्नत्यागाचाही इशारा पत्रकारपरिषदेत देण्यात आला.

कमी उत्पन्नाचे कारण दाखवून थांबा नाही
कोरोनापूर्वी या रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा होता. मात्र कोरोना कालावधी संपल्यानंतर या अधिकाऱ्यांनी या रेल्वे स्थानकाचे कमी उत्पन्न मिळत असल्याचे भासविले आहे. विशेष म्हणजे रेल्वे थांबत नाही तर हे उत्पन्न आलेच कसे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.या रेल्वे स्टेशनवर रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी माती काम केलेले आहे. तर क्रॉसिंगचे ३ रूळ असल्याचे दाखविले आहे. मात्र प्रत्यक्षात खडी टाकली असून त्यावर रूळ टाकलेले नाहीत. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला आहे की काय ? याची चौकशी करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...