आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:मस्सां (खं) सरपंच पदी‎ त्रिंबक कचरे तर‎ उपसरपंच पदी तांदळे‎

मस्सां (खं)‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील मस्सां (खं)‎ येथील ग्रामपंचायत च्या सरपंच पदी‎ त्रिंबक कचरे तर उपसरपंच पदी‎ संदीप तांदळे यांची बिनविरोध‎ निवड करण्यात आली.‎ कळंब तालुक्यातील मस्सां(‎ खं) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक‎ निवडणूकीमध्ये खंडेश्वरी‎ ग्रामविकास पॅनलचे लोकनियुक्त‎ सरपंच त्रिंबक कचरे यांच्यासह नऊ‎ सदस्य हीबहुमताने निवडून आले.‎ सरपंच त्रिंबक कचरे यांच्या‎ अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या‎ निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात‎ आला.

संदीप तांदळे यांनी‎ उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज‎ भरल्याकारणाने त्यांची उपसरपंच‎ पदी निवड झाल्याचे निवडणूक‎ निर्णय अधिकारी काळे यांनी जाहीर‎ केले. तर विरोधी दोन सदस्य‎ गैरहजर राहिले. यावेळी सरपंच‎ त्रिंबक कचरे, ग्रामपंचायत सदस्य‎ गणेश शेळके, जालिंदर किलचे,‎ इंदुबाई वरपे, रेखा थोरात, अशाबाई‎ सावंत, सुनीता वरपे, सुरेखा माळी,‎ गीता ताटे उपस्थित होते.‎ निवडणूक निर्णय अधीकारी‎ म्हणून ए. व्ही. काळे, तसेच यावेळी‎ ग्रामविकास अधीकारी ए. बी.‎ वाघमारे, तलाठी वाघ, सहायक‎ पोलीस निरीक्षक अतुल पाटील‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...