आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा खोरे सिंचन योजनेमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पांना ब्रेक लागला होता. मात्र, आता अर्थसंकल्पात याची भरीव तरतूद केल्याने या योजनांना गती येणार आहे, अशी माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ‘जिल्ह्याला अर्थसंकल्पातून काय मिळाले’, याची माहिती देण्यासाठी आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर उपस्थित होते. राणा पाटील म्हणाले की, १९९९ ला डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळवून घेतली होती.
मध्यंतरी यासाठी तरतूद करण्यात आली. नंतर महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रशासकीय मान्यता न दिल्याने प्रकल्प रखडला. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ हजार ६२६ कोटींची मान्यता दिली आहे. यामुळे २०२४ मध्ये सिंचनासाठी जिल्ह्याला पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचीही अशीच परिस्थिती होती. याचाही मार्ग माेकळा होणार असून सीना कोळेगाव, निम्न तेरणा व उजनी प्रकल्प एकमेकांना जोडून पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. राज्याच्या बजेटमुळे राज्यासह जिल्ह्यालाही नवी दिशा मिळणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत याचा अॅक्शन टेकिंग रिपोर्ट सादर केला जाणार आहे. यामुळे सर्व योजना केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता, अंमलबजावणी होणार आहे.
आमदार पाटील म्हणाले
मेडिकल कॉलेजसाठी आयटीआयची जमीन हस्तांतरणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली बैठक. धाराशिव नामांतरासाठी सर्व बाबींची पूर्तता शिंदे-फडवणीस सरकारने केली, महाविकास आघाडीने श्रेय घेणे निरर्थक.सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी ५० टक्के वाटा मंजूर केल्याने आता या कामाला गती येणार आहे. नागपूर ते गोवा महामार्ग तुळजापुरातून जात असल्याने जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. शहरांची बाजारपेठ जवळ. मराठवाडा व कोकणात दुग्धविकास होण्यासाठी १६० कोटींची तरतूद केल्याने धाराशिव जिल्ह्यातील दुग्धोव्यवसायाला चालना मिळणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.