आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:रोहित्र जळाल्याने खामसवाडीत 3 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न; नागरिकांची पाण्यासाठी वनव

खामसवाडी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मागील तीन दिवसांपासून उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महावितरण नवीन रोहित्र बसवण्यास व दुरुस्त करण्यात चालढकल करत आहे.

तीन दिवसांपासून शेतातील वीज बंद असल्याने असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी मोहा उपकेंद्रातून एक तास वीज सोडली, परंतु लोड येत नसल्याने विद्युत मोटारी चालू होत नाहीत. महावितरणकडे विजेची पर्यायी व्यवस्था नाही. इतर गावातील उपकेंद्रावर पर्याय उपलब्ध आहे. परंतु खामसवाडीत एकच रोहित्र असल्याने अडचण येत आहे.

गावात पिण्याच्या पाण्यासाठी मोहा येथील उपकेंद्रातून विजेची सोय केली. परंतु लोड येत नसल्याने विद्युत पंप चालू होत नाहीत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम आहे. गावात अंधार होऊ नये, यासाठी मोहा येथून सायंकाळी ७ ते सकाळी ६ दरम्यान वीज चालू केली. परंतु कमी दाबामुळे घरातील उपकरणे नादुरुस्त होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...